Khed-Eknath-Shinde
राजकीय

त्यांचे राज्यभरात सर्कशीप्रमाणे शो होणार; शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

खेड : शिवसेना पक्ष आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लवकरच लागणार आहे. मात्र राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यातच शिंदेंना शिवसेना पक्ष चिन्हासहित मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. यामुळे उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून कोकणातील खेड येथे त्यांनी सभा घेतली होती.

या सभेला आज एकनाथ शिंदेंची उत्तर सभा होत आहे. विशेष म्हणजे ज्या मैदानावर ठाकरेंनी सभा घेतली होती, त्याच मैदानावर ही सभा आयोजित क?ण्यात आली आहे.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला डाग लावण्याचं काम केलं. मात्र आपण ते सोडवून आणलं.

निवडणूक आयोगाने देखील आपल्या बाजुने निकाल दिला. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे. मात्र यांनी सत्तेसाठी आपली भूमिका बदलल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

आपण उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. खर्‍या अर्थाने आरोप किंवा टीकेला उत्तर देत असतात. परंतु, तोच-तोच थयथयाट तीच तीच आदळआपट, यावर काय बोलणार, मुंबईत सहा महिन्यापासून थयथयाट सुरू आहे, असं शिंदे म्हणाले.

मुंबईत काही बैठका झाल्या. महाराष्ट्रात देखील सर्कशीप्रमाणे राज्यभर शो होणार आहे. तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणं, हे सगळ तेच असतं. फक्त जागा बदलत जाते. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार. त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांच्याविषयी मला काही सांगायची इच्छा नाही, असंही शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री होऊ शतकतो. परंतु, मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून २००९ ला उद्धव ठाकरे यांनी मला पाडलं. त्यावेळी दापोली मतदारसंघातून मी तिकीट मागितलं असताना मला गुहागरमधून तिकीट देऊन मला पाडलं. उद्धव ठाकरे यांनी मला त्यावेळी गाफील ठेवून धोका दिला. दापोलीत देखील योगेश कदम यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले.

योगेश कदम यांना कसं संपवायचं या कटात उद्धव ठाकरे सामील होते, असा आरोप यावेळी रामदास कदम यांनी केला. ‘आम्ही स्वच्छ हाताने जगलोय. कोठेही डाग लावून घेतला नाही आणि मरेपर्यंत डाग लावून घेणार नाही. पण श्रीलंका, लंडन आणि शिंगापूरला कोणाची हॉलेटल आहेत हे एक दिवस समोर आणल्याशिवाय हा रामदास कदम शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

कोकणची जणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिमागे ठाम उभा आहे हे आज येथील जनतेने दाखवून दिले आहे. दिवसरात्र काम करणारे एकनाथ शिंदे हे राज्याला लाभलेले पहिले मुख्यमंत्री आहेत, असे कौतुक यावेळी रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं. बाळासाहेब असते, तर मनोहर जोशाींबद्दल असं केलं असतं? बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते.

आनंद दिघे जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी वैयक्तिक शब्द टाकला. माझं काही काम करू नको, पण आनंद दिघेला काढण्यासाठी मदत कर. तुम्ही तर कार्यकर्त्यांना संपवायला निघाले. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ते मोठे झाले, तर पक्ष मोठा होतो. एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला, तर त्यांची पोटदुखी सुरू होते.