देश

तीस दिवसाच्या नंतरही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ नाही

नवी दिल्ली,१६ऑगस्ट, न्यूज डेस्क:-आतंरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होऊनही३०व्या दिवशीही पेट्रोलियम-डिझेलच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही.देशात पेट्रोल१०८रुपयेतर डिझेल च्या किंमती१००रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत.१८जुलै पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही.१७जुलै रोजी २९त३०पैशांनी इंधनाच्या दरात वाढ झाली होती. आज रोजी मुबई मध्ये१०७.८३रुपये पेट्रोल तर९७.४५रुपये डिझेल प्रति लिटरचे भाव असून, देशाच्या राजधानी मध्ये पेट्रोल१०१.८४रुपये तर डिझेल८९.८७रुपये प्रती लिटर आहे.कोलकोत्यात पेट्रोल१०२.०८रुपये तर डिझेल९३.०२ रुपये प्रतीलीटर आहेत.तर चेन्नईत१०२.४९रुपये पेट्रोल तरडिझेल९४.३९रुपये प्रती लिटर प्रमाणे भाव आहेत. जुलै महिन्याच्या १८तारखेपर्यंत पेट्रोलच्या९वेळा आणि डिझेलच्या किमतीत५वेळा वाढ झाली आहे.इंधनाच्या किमतीत१ वेळाच घट झाल्याचे दिसते. येत्या काही दिवसांत इंधनाच्या किमतीत कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे?कारण कंपन्यांनी तेलाच्या किमती देशात १५जून २०१७ पासून इंधनाच्या दरात रोज बदल होण्याची प्रक्रिया सुरू झाली,पेट्रोल कंपन्यांनी जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे जाणून घेण्यासाठी कळू , इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा जो कोड असेल तो टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).त्या  कोड वरून हेे माहिती मिळवु शकते.