मनोरंजन

तारक मेहता का उलटा चष्मा, मधील टप्पू सोबत,बबीताजी रिलेशनशिप मध्ये!

मुंबई, ९सप्टेंबर: तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम ‘बबीता जी’  म्हणजेच मुनमुन दत्ता   हिच्या बद्दल मीडिया मध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.   तारक मेहता का उलटा चष्मा, मधील टप्पू अर्थात राज अनादकत सोबत,बबीताजी रिलेशनशिप मध्ये असल्याने, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.बऱ्याच दिवसांपासून   मुनमुन दत्ता ही  शो पासून दूर होती.

त्यानंतर आता तिने पुन्हा शो मध्ये एन्ट्री केली आहे. अशातच एक खळबळजनक बाब समोर आल्याने ती तुम्ही ऐकाल तर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. तर मुनमुन दत्ता ही तिच्या वयापेक्षा 9 वर्षाने कमी वय असलेल्या अभिनेत्याला डेट करत आहे. हा अभिनेता कोणत्याही दुसऱ्या शो किंवा सिनेमातील नव्हे तर तारक मेहता मधील फेम अभिनेताच आहे.

ईटाइम्स मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, मुनमुन दत्ता ज्या अभिनेत्याला डेट करतेय त्याचे नाव राज अनादकत (Raj  Anadkat) असे आहे. हा राज नेमका कोण तर जेठालाल याच्या काळजाचा तुकडा टप्पू आहे.

असा दावा करण्यात आला आहे की, दोघे सध्या रिलेशनशिप मध्ये आहेत. त्याचसोबत मुनमुन हिच्या इंस्टाग्रामवरील कमेंट्सवरुन आता युजर्सकडून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहे.तारक मेहता शो मधील सर्वांना याबद्दल माहिती आहे की, त्या दोघांमध्ये नेमके काय सुरु आहे.

या प्रकरणासंबंधित एका सुत्राने म्हटले की, मुनमुन दत्ता आणि राज याच्या परिवाराला सुद्धा त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. तसेच दोघेजण एकमेकांना काही काळापासून डेट करत आहे. तर मुनमुन आणि राज यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे आता सर्वांच्याा भुवया उंचावल्या गेल्या आहेत