लेख

तरुणाईने देशहित बघितले पाहिजे

कोणत्याही देशाची संपत्ती हि त्या देशातील युवा वर्ग असतो. याच युवा वर्गाच्या जोरावर देशाची आर्थिक सामाजिक व भौतिक प्रगती अवलंबून असते. भारत सध्या तरुणांचा देश आहे. जागतिक स्तरावर युवकांची सर्वात मोठी फौज भारताकडे आहे. परंतु या देशात सर्वात मोठी एक खंत, शोकांतिका आहे कि या युवकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम, देशहीत विचारांची पेरणी होत नाही. आणि काही सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते देशहीताच्या विषयावर प्रबोधन जागृती करण्याचा प्रयत्न करतात त्यांना नक्षलवादी म्हणून शिक्कामोर्तब करून तुरुंगात टाकले जाते किंवा तडीपार केले जाते, कोणत्या ना कोणत्या मार्गाने देशहीताचे राष्ट्रभक्तीचे एकता व अखंड देशाच्या हिताच्या विचाराची पेरणी होऊ नाही म्हणून सत्तेचा दुरुपयोग करुन धर्माच्या नावाने मलिदा खाणार्‍या व्यवस्था प्रयत्न करतात. परंतु या नकारात्मक बाबींचा तरुणांनी विचार न सकारात्मक व विवेक जागृत करून आपले व आपल्या देशाचे हित कशामध्ये आहे यावर कार्य करणे आवश्यक आहे.

प्रस्थापित व्यवस्था ज्वलंत विषयावर दूर्लक्ष होण्यासाठी वादग्रस्त विधान असतील, दोन गटात तणाव असतील, धार्मिक विधाने असतील अशा प्रकरणाकडे लक्ष वळवून ज्वलंत, सामाजिक, आणि राष्ट्र हिताच्या विषयांकडे पूर्णतः दूर्लक्ष होते. जसे सध्या प्राथमिक शिक्षणा जवळपास खाजगीकरणच झालेले आहे. उत्तम दर्जाचे शासकीय शाळेमधून शिक्षण घेऊन अनेक लोक अनेक उच्च पदावर पोहचले याचे करोडो उदाहरणे आहे.

the-prime-minister-appealed-to-the-youth-of-meghalaya-and-nagaland-to-vote-in-record-numbers

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे जिव्हाळा, आत्मसन्मान आणि यशस्वी होण्यासाठी प्रेरणा स्त्रोत होते. परंतु आज जिल्हा परिषद शाळा बंद करून खाजगी शाळेला परवानगी देऊन यांनी शिक्षणाचा बाजारच मांडला नाही तर या देशातील मध्यम वर्गीय, गरीब, अल्पभूधारक, शेतमजूर, इतर असंघटित काम करणारे कामगार, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांना जर आपल्या मुलांना शाळा शिकवायची असेल तर यांची कमाई कीती आणि शाळेची फी किती याचा विचार जरी केला तरी डोळ्यासमोर फक्त प्रश्नच प्रश्न उपस्थित राहतात. थोडा तरी विचार करायला पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये एका वर्षाला जेवढा खर्च यायचा त्यापेक्षा किती तरी पट खर्च खाजगी शाळेमध्ये येतो. गावातील मजूर, दुकान दार, अल्पभूधारक कर्ज काढून, इकडून तिकडून करून वर्षे दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे शाळा शिकवले, पण विचार करा दहा वर्षानंतर विद्यार्थांचे भविष्य काय राहणार आहे. आणि प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी एवढा खर्च येतो तर माध्यम आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची कल्पना तर कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. उच्च शिक्षणाचा तर विचार न केलेला बरे. उच्च शिक्षण नाही म्हणजे चिकित्सा आणि संशोधन करण्याचा प्रश्नच येणार नाही. मग अजून माणसिक गुलामी कडे वाटचाल होईल.

एका वर्णातील लोक शिकतील, चुकीची माहिती समाजात देऊन मानसिक गुलाम बनवतील. दुसरा विषय आहे रोजगार. आजच्या घडीला जे शिक्षीत आहेत त्यांना रोजगार मिळत नाही आहे. सरकारने तरुणांना रोजगार देण्याचे बंदच करून टाकले आहे. घाण्याभोवती ज्या प्रमाणे बैलाला हिरवा चारा दाखवून दिवस भर काम करून घेतले जाते. हिरवा चारा मिळेल या अपेक्षेणे दिवसभर फिरणार्‍या बैलाला काम झाल्यावर का होईना पण दाखवलेला चारा मिळतो. परंतु आज रोजगाची परिस्थिती खुपच बिकट आहेत.

तरुणांचे रोजगार मिळवण्याचे वय निघून चालले तरी यांना रोजगार मिळत नाही आहे. आणि मग हेच बेरोजगार असलेले हताश झालेले तरुण जेथे मिळेल जेवढे मिळेल जे मिळेल ते करण्यासाठी तयार होतात. स्वतः चा उदरनिर्वाह न करू शकणारे तरुण राजकीय नेत्यांचे समर्थक बनून मागेपुढे करतात काही तरी मिळेल म्हणून शिक्षीत युवा पिढी अडाणी नेत्यांच्या चटया उचलतात. पण शेवटी हाती काहीच मिळत नाही. अस करून रोजगारा सोबतच अनेक समस्या निर्माण होतात जसे शिक्षीत असेल आणि रोजगार नसेल तर कोणी मान सन्मान देत नाही, लग्न करण्यासाठी मुलगी देत नाही अशामुळे मानसिक खच्चीकरण होते आणि माणसिक खचलेल्या व्यक्तीला सर्व दारे बंद झालेली असतात. म्हणून तरुणांनी रोजगार मिळण्यसाठी, सरकार वर नियंत्रण ठेवण्यासाठी एकत्र येऊन एकशक्तने उभे राहणे आवश्यक असताना तरुणा सुद्धां व्यक्ती पुजेमध्ये गुंतलेली आहे.

कोणतीही व्यक्ती पुजा माणसाच्या प्रगतीची दार उघडू शकत नाही हेही तेवढेच खरे. म्हणून तरुणाई ने हा राजकीय माझा, माझ्या जातीचा, माझ्या जवळचा आहे या भ्रमात राहु नये. हाताला रोजगार नसताना जीवनावश्यक वस्तुच्या किंमती आवाक्या बाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू विकत घेण्याची सुद्धा आज कुवत युवका कडे राहली नाही कारण एकीकडे बेरोजगारी आणि एकीकडे महागाई ने तरुणाई सोबत सामाजिक जिवन होरपळत आहे. अल्पभूधारक, शेतमजूर, फेरीवाले, असंघटित कामगार रोजंदारीवर रोज कामाला जातात राबराब मेहनत करतात परंतु घरामध्ये महिनाभर पुरेल एवढी खाण्याची सोय नसते. एक दिवस कामाला नाही गेला तर कुठे तरी तडजोड करून एखादी वस्तू कमी घ्यावी लागते.

उन वारा पाऊस थंडी कशापासून संरक्षण होईल असा प्रकारची पक्की घरे सुद्धां नाहीत आहेत. पौष्टिक अन्न सोडा साधे जेवन मिळेल की नाही याची चिंता करोडो कुटुंबाना आहे. बर हि परिस्थिती फक्त अल्पभूधारक, शेतमजूर, असंघटित कामगार यांच्या वरच नाही तर शेतकरी नोकरदार यांच्या वर सुद्धा हिच परिस्थिती आहे परंतु प्रतिष्ठा टिकण्यासाठी हे लोक स्पष्ट बोलत नाहीत किंवा दाखवत नाहीत. नाहीतर यांच्या मागेही वसुली करणार्‍या गाड्या असतात च. एवढी महागाई वाढली पण तरुणांचा आवाज महागाई विरोधात निघत नाही याचे कारण काही हा संशोधनाचा विषय झाला आहे. शिक्षण, रोजगार, महागाई या सामाजिक समस्या आहेत सोबतच या वरिल तिन कारणामुळे उत्पन्न झालेली आणि सरकारने दुर्लक्षित केलेली मुलभूत सुविधा म्हणजे आरोग्य. सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. जर कोणाला अचानक किंवा नियोजन करून ही जर हॉस्पिटलमध्ये अँडमिट व्हायचेच झाले तर मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन पुर्ण इलाज किती लोक कोणाचीही मदत न घेता करू शकतात या विषयी जास्तीची माहिती देण्याची गरज नाही.

दोन तीन दिवस एखाद्या हॉस्पिटल मध्ये जर भरती केले तर हजारों लाखोंचे बिर निघतात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले तर इलाज बरोबर होत नाही. डॉक्टर उपलब्ध नसतात, सुविधा नसतात, औषधी नसतात अशा परिस्थिती मध्ये सर्व सामान्य माणसाने काय करावे हाच प्रश्न असतो आणि हि समस्या सर्व नागरिकांना भेडसावत असते. एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये अँडमिट केल्यानंतर त्यांच्या घरच्या ची परिस्थिती बघा कशी होते आणि हॉस्पिटलमधुन घरी आणल्या नंतर दोन चार वर्षे पोटाला चिमटा देऊन हॉस्पिटलचा खर्चाची परतफेड करण्यात जातो.

कारण तेव्हा नातेवाईक मित्रमंडळी यांच्या कडून पैसा घेतला जातो. थोडक्यात तरुणांनी जर विचार केला तर सरकार शिक्षण, रोजगार देत नाही वरून शिक्षणाचा व्यवसाय करून टाकला, महागाई वाढली, आरोग्याची समस्या निर्माण झाली तर त्यांच्या कडे नियोजन नाही. वरुन भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणार्‍याला परवानगी देऊन अजून लोकांच्या जिवनाशी खेळले जाते. खाद्यतेलामध्ये भेसळ केली जाते, दुधामध्ये भेसळ करून लोकांना विकले जाते.

जर तेल दुध या सारख्या पदार्थंनाच दुषीत व भेसळ करून रसायनांचा, खाण्यास योग्य नसलेल्या पदार्थाचा वापर करून लोकांच्या शरीरात जात असेल आणि वरून सरकार यासाठी काहीच करत नसेल तर तरुणांनी विचार करायला पाहिजे. वरिल गोष्टी फक्त तुमच्या वैयक्तिक नाहीत तर देशाशी देशाच्या हिताशी संबधीत आहेत. शिक्षण नसेल तर अडाणी देश निर्माण होईल, रोजगार नसेल तर बेरोजगार युवकांची संख्या वाढेल, महागाई असेल तर उपासमार व कुपोषण वाढेल आणि आरोग्य सुविधा नसतील तर मृत्यू दर वाढून रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन देश कमकुवत होईल.

या चार गोष्टी जरी मिळाल्या तरी देशाला शिक्षणामुळे ज्ञान आणि संशोधन मिळेल, रोजगार असल्याने दरडोई उत्पन्न वाढून राहणीमान सुधारेल, रुपया मजबूत होईल. महागाई नियंत्रणात असल्याने आपण तंत्रज्ञान व भौतिक सुखाचा उपभोग घेऊ शकू पर्यटनामध्ये वाढ करू शकु, आणि आरोग्य सुविधा असल्याने एक शक्तीशाली, निरोगी देश घडवू शकु आणि हेच तर खर्‍या अर्थाने देशहीत आहे. आणि यासाठी तरुणांनी एकत्र येऊन तरुण हि उर्जा आहे आणि या उर्जेचा फायदा देशाला गतीमान करण्यासाठी झाला तरच आपल्या तरुणांचा देशाला फायदा झाला याचे सार्थक होईल.

विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर मोबा : ९१३०९७९३००