मूर्तिजापूर22फेब्रुवारी- तालुक्यातील एका गावात राहणारी महिला तब्बल पाच वर्षांपूर्वी हरवली होती तिचा शोध घेण्यास ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील दताळा येथील यशोदा पंजाबराव उमाळे वय वर्ष ५४ ह्या महिला हरविल्या असल्या बाबतची तक्रार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला मार्च २०१८ मध्ये देण्यात आली होती सदर तपास हा पोलीस उपनिरिक्षक नवलाखे यांचे कडे असता तपासाची चक्र फिरवीत शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना तब्बल पाच वर्षानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी माहीती मिळाली की बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येत असलेल्या पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान येथे ह्या महिला राहत आहेत यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांनी कुठलाही विलंब न करता नातेवाईकांना कळवून त्यांच्याकडून सदर महिला त्याच असल्याची खात्री करून घेतल्यानंतर दिनांक २० फेब्रुवारी रोजी सदर ठिकाणी आपले अधिकारी/ कर्मचारी, नातेवाईकासह जाऊन महिलेला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर ग्रामिण पोलीस स्टेशनला आणून पुढील कारवाई करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.यासाठी ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नवलाखे ,पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर ,हेड पोलीस कॉन्स्टेबल लांजेवार,पोलीस कॉन्स्टेबल विवेक देविकर ,पोलीस कॉन्स्टेबल अनिल तोपकर यांनी परिश्रम घेतले या कामगिरी बद्दल नातेवाईकांनी आभार व्यक्त केले यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.