पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत.
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथे मंगळवारी सात मजली इमारतीत झालेल्या स्फोटात १४ जण ठार तर १०० हून अधिक जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. अग्निशमन सेवा नियंत्रण कक्षाच्या हवाल्याने बीडीन्यूज २४ न्यूज पोर्टलने वृत्त दिले आहे की, दुपारी ४:५० वाजता (स्थानिक वेळेनुसार) स्फोट झाल्यानंतर अनेक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘ढाका ट्रिब्यून’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Dhaka after the blast. pic.twitter.com/2Ab4gFvp7P
— Deep Halder (@deepscribble) March 7, 2023
वृत्तानुसार, इमारतीच्या तळघरात अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. स्फोटाच्या ठिकाणाजवळ असलेले आलमगीर म्हणाले, “मोठ्या आवाजानंतर लोक घाईघाईने इमारतीतून बाहेर पडू लागले. सगळे घाबरलेले दिसत होते. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा तुटून रस्त्यावर पडल्या. अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. “बॉम्ब डिस्पोजल युनिटची रॅपिड अॅक्शन बटालियन घटनास्थळी पोहोचली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत आणि लगतच्या इमारतीत BRAC बँकेची शाखा आहे. स्फोटामुळे बँकेच्या इमारतीच्या काचेच्या भिंतीला तडे गेले. स्फोटामुळे रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाले आहे.