क्राईम

डोंबिवली रेल्वे पुलावर प्रवाशाला मारहाण

डोंबिवली : क्षुल्लक कारणावरून एका प्रवाशाला रेल्वे पुलावर दोघांनी बेदम मारहाण केल्याचा घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.,

याबाबस्ट मिळालेल्या माहितीनुसार, सागर भिसे हा प्रवासी अंबरनाथ फास्ट लोकलने घाटकोपर येथून प्रवास करत डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरला. मात्र रेल्वे पुलावर प्रवाशांची गर्दी असल्याने सागरचा पाय एका प्रवाशाच्या पायाला लागला.

सागर त्या प्रवाशांची क्षमा मागून पुढे गेला. याचा राग आल्याने दोघा प्रवाशांनी पुढे जाऊन सागर अडवले. ”तू पाय का मारला”तुला दिसत नाही का ”अश्या शब्दात सागरला दोघांनी जाब विचारला. क्षमा मागितली असून वाद नको असे सागर त्या दोघांना म्हणाला.मात्र दोघांनी सागरशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

वादाचे पर्यावसन हाणामारी होऊन सागर व दोघा प्रवाशांमध्ये रेल्वे पुलावरच मारामारी सुरू झाली. यावेळी रेल्वे पुलावर प्रवाशांची गर्दी जमली होती. याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस पुलावर धावत आले. या प्रकरणी सागरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.