क्राईम

डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांं ३३पैकी२९नाराधामांना अटक

 मुंबई२५ सप्टेंबर:-कल्याण डोंबिवलीतील ओळखीचा फायदा घेत,गुंगीचे औषध शीतपेयातून देऊन, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या३३नाराधामांंपैकी२९ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली.२९जानेवारी२०२१रोजी ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचे आरोपी विजय फुके याने तिला न कळत अश्लील फोटो काढून, त्या आधारे, अल्पवयीन मुलीला ब्लॅक मेल करायला सुरुवात केली होती.त्यानंतर विजय फुके ने मित्राच्या मदतीने गुंगीचे औषध शीतपेयातून पाजून, तसेच बळजबरीने दारू पाजून आपल्यावर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपल्या दिलेल्या जबाबात सांगितली,त्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत २९नाराधामाना अटक केली.अटक करण्यात आलेल्या२९आरोपींपैकी दोन चाआरोपी अल्पवयीन  आहेत. शुक्रवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर, उर्वरित ४ आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत तीन पथके रवाना केली आहेत. या गंभीर प्रकरणाचा सहाय्यक सोनाली ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला पथक करत आहे. दरम्यान हे सर्व आरोपी नशेबाज असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी निदर्शने करत असल्याने तणाव निर्माण झाला होता.दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार भारती लवेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी मानपाडा पोलिसांची भेट घेत घटनेची माहिती घेत निष्पक्षपाती चौकशीची मागणी केली.एकादिवशी दहा जणांनी आणि मे महिन्यात एकादिवशी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत १५ जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडीत मुलीने केली आहे. याचदिवशी दिवसभर मुलगी घरी न आल्याने ती हरविल्याची तक्रार तिच्या आईने मानपाडा पोलिसांत केली होती. यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असती तर तिच्यावर त्यानंतर चार वेळा झालेल्या सामूहिक अत्याचारातून तिची सुटका झाली असती,परंतु मानपाडा पोलिसांच्या हलगर्जीपणा मुळे पीडित मुलगी सामूहिक अत्याचाराला बळी पडल्याच्या भावना,जनतेतून येत आहेत.