अकोला

डॉ.अढाऊ यांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार

अकोट : ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगाव व्दारा आयोजित ऐतिहासिक परिषद २०२३ ता.२० फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आली होती.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बहुजनांचे दिपस्तंभ श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून होते.

ऐतिहासिक परिषदेत कार्याची दखल घेत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एस. एस. अढाऊ यांनी व यांच्या टीमने लंम्पि या आजाराच्या वेळे उत्कृष्ट काम केल्या बद्दल यांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ऐतिहासिक परिषदेला प्रा.अंजलीताई आंबेडकर,वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर,परिषदेचे अध्यक्ष गोपाल राऊत, बालमुकुंद भिरड,अ‍ॅड.संतोष रहाटे,वंचित युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, दिपक बोडखे, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र औईंब आदी उपस्थित होते.ऐतिहासिक परिषदेला हजारोंच्या संख्येने ओबीसी व अत्यल्प समाज बंधुभगिनींची उपस्थिती होती.