मृतदेह वाहनातून संशयास्पद फिरवताना पोलिसांनी घेतले होते ताब्यात!
प्रमोद कढोने पातूर18 सप्टेंबर :चारचाकी वाहनातून पत्नीचा मृतदेह संशयास्पद फिरवतांना पातूर शहरातील एका खाजगी डॉक्टरला चान्नी पोलिसांनी शुक्रवार दि.16 सप्टेंबरच्या चोंढी परिसरातुन ताब्यात घेतले होते.दरम्यान पोलिसांनी सदर डॉक्टरची चौकशी केली असता डॉक्टर पतीने पत्नीची प्रकृती खराब आहे,पत्नीने आत्महत्या केली,हृदयविकाराने मृत्यू झाला अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिल्याने चान्नी पोलिसांनी मृतदेह चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला होता.
दरम्यान आज दि.17 सप्टेंबर रोजी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी नुसार गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी डॉक्टर असलेल्या आरोपी पतीस अटक केली.पातूर येथील समर्थ नगर येथे राहणाऱ्या व मुळगाव चोंढी असे असलेल्या डॉक्टर राजेश भास्कर ठाकरे याने दि.16/09/2022 रोजी सायं.6 ते 7 वाजताच्या दरम्यान त्याची पत्नी वर्षा भास्कर ठाकरे (वय 35) हिची गळा आवळून हत्या केली व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने चोंढी येथे घेऊन गेला असता गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने सदर डॉक्टर हा परत पातूरकडे येत असतानाच
चान्नी पोलिसांनी त्याला पकडल्याने संपूर्ण प्रकारणाचा उलगडा झाला.
सदरच्या प्रकरणी वर्षा भास्कर ठाकरे (वय 35), रा.समर्थ नगर पातूर हिची हत्या केल्याप्रकरणी
चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश भास्कर ठाकरे (वय 42) रा.समर्थ नगर,पातूर यास अटक करून कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल केला असून पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार हर्षु रत्नपारखी करीत आहेत.