ताज्या बातम्या

डेंगुसदृश तापाने फणफणतेय धानोरा वैद्य

अजय प्रभे

मूर्तिजापूर,ता.२३ : मूर्तिजापूर तालुक्यातील धानोरा वैद्य गावात डेंगुसदृश तापाने थैमान घातले असून घराघरात रुग्ण आहेत.तेथील स्वस्त धान्य दुकानदार देवानंद वानखडे, त्यांच्या पत्नी शोभा वानखडे, मुलगा आदित्य, मुली आकांशा, आचल एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. शोभा वानखडे यांना डेंग्यू सदृश लक्षणे आढळून आली आहेत, तर देवानंद वानखडे यांना थंडी ताप, आदित्य ला तीव्र ताप आणि डोके दुखत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. आकांश आणि आचल यांना ही ताप आला,धानोरा वैद्य गावाची गट ग्रामपंचायत आहे, धानोरा वैद्य, किन्हीआणि फणी गावाचा समावेश आहे, धोत्रा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हे गाव येते, गावात प्रत्येक घराघरात,थंडी ताप,डोके दुखी, इ रुग्ण दिसुन येतात. डेंग्यू सदृश तापाने आजारी असलेले रुग्ण आचल,पियुष,मयुर गिरी,खुशी मोहोड, नागेश वानखडे इ विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेने प्रत्येक कुटुंबाची तपासणी करून गावात आरोग्य शिबिर घेण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावात नळयोजना आहे. पाणी पंधरा दिवसांनी सोडले जाते. नियमित वीजपुरवठा होत नसल्याने जलकुंभा भरली जात नसल्याचीही त्यांची तक्रार आहे.
धानोरा वैद्य गावात तापाची साथ आहे, त्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र धोत्रा शिंदे यांना कळविले आहे.
-विजया निलेश कवटकर
सरपंच, धानोरा वैद्य
—————————————————-