क्राईम

डांबरचा अवैध साठा जप्त! पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई!

अजय प्रभे मुर्तिजापूर:-अकोला २नोव्हेंबर:- अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या,राष्ट्रीय महामार्गावर येत असलेल्या, एका ढाब्यारून, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने डांबरच्या साठ्यासह बायो डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाच्या कारवाईमुळे बायो डिझेलचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार१नोव्हेंबर२०२१रोजी विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६ला लागून असलेल्या मौजे हेण्डज येथील सतनाम ढाब्यावर,डांबर टँकर मधून काढून विक्री करण्यासाठी साठा करण्यात आला आहे, त्याच प्रमाणे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसतांना बायो डिझेलची विक्री केली जात आहे. अशी माहिती मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे, नमूद ठिकाणी छापमारी केली असता,सतनाम ढाब्यावर १लाख रुपये किंमतीचा १५३०किलो डांबरचा साठा,बायो डिझलची ३०हजार लिटरची टॅंक,किंमत१ लाख रुपये साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणात सतनामसिंग रंजनसिंघ गिल, वय ४८वर्षे आणि गौरव श्रीराम बोकडे वय २८वर्षे, रा.सतनाम ढाबा,हेण्डज यांना अटक करण्यात आली असुन, त्यांच्यावर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवनावश्यक अधिनियम कलम ३,७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

बायो डिझेलच्या नावाखाली एका विशिष्ट प्रकारच्या केमिकलची विक्री केली जात असून, यामुळे अनेक वाहन धारकाचे महागड्या गाड्यामध्ये बिघाड झाला असून,वाहन धारकांना आर्थिक भुदंड झाला असून, यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक बायो डिझेलच्या नावाखाली केमिकल विक्री करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून,आता अकोला जिल्ह्यात सुद्धा कारवाई झाल्याने,बायो डिझलचा व्यवसाय करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे, हे विशेष.