मुबई२०सप्टेंबर:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख,शिवसेनेचे अनिल परब,भावनाताई गवळी, यांचावर भ्रष्टाचाराचे आरोपी करीत आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १००कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तोफ टाकली आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.हसन मुश्रीफ यांच्या वर केलेल्या आरोपामुळे मला अटक करण्यात आली आहे, ठाकरे सरकारची ही दादागिरी खपवून घेणार नाही,असा इशारा ,कराड पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अटक केल्यानंतर सोमैया यांनी दिला आहे.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुळे मला अंबा देवीचं दर्शन घेता आलं नसल्याची खंत व्यक्त केली. गडहिंग्लज येथे असलेल्या आप्पासाहेब नलावडे कारखान्यात मुश्रीफ यांनी१००कोटींचा अपहार केल्याचा आरोप करीत,ईडीच्या कारवाईची भीती वाटत असल्याने,सूड भावनेतून मला केलेली आजची अटक आहे.या संबंधीचे सर्व पुरावे ईडीला देऊन, चौकशीची मागणी करणार असल्याचे, किरीट सोमैया यांनी सांगितले.तसेच आणखी एक घोटाळा लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचेही कराड येथे झालेल्या अटकेदरम्यान त्यांनी स्पष्ट केलं.किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती. दरम्यान, काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरीही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज राजकीय नाट्य पहावयास मिळाले.