क्राईम

ट्रकची धडक : दुचाकीस्वार जागीच ठार

अजय प्रभे:,

मूर्तिजापूर,ता.११ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील जामठी फाट्याजवळील उमा नदीच्या पुलानजिक भरधावा ट्रक ने दुचाकीला मागून धडक दिल्याने आज दुपारी ३.१५ वाजता झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीचा सतिश रघुनाथ सुलाताने हा ३८ वर्षीय युवक दुचाकी (क्रमांक एमएच२७ केएल ८२२७) ने अमरावतीहून मूर्तिजापूरकडे येत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रक (क्रमांक एमएच४८सी८६४९) ने त्याला मागून जबर धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माना पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक घनश्याम पाटील व त्यांचे सहकारी तसेच वंदेमातरम आपत्कालीन पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व त्यांनी मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पोचविला.