मुंबई

ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या ‘माध्यमाच्या पटावरून’ आत्मचरित्राचा आज प्रकाशन सोहळा

शरद पवार, शिंदे, फडणवीस एकाच व्यासपीठावर

मुंबई : महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारितेचा लेखा जोखा असलेला माध्यमाच्या पटावरून या आत्मचरित्राचा प्रकाशन बुधवार ८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजता राष्ट्रवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे, आमदार कपिल पाटील, प्रकाशक येशू पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन, दुसरा मजला, आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे.