Devendra-Fadanavis
ताज्या बातम्या राजकीय

जुन्या पेन्शनवर मार्ग काढू, संप करु नका !

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मुंबई – शासकीय कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग लागू केल्यानंतर अनेक राज्यांचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यांतही जूनी पेन्शन योजना बंद करुन नवीन पेन्शन योजना सुरु केली आहे. मात्र, आता जुन्या पेन्शनची मागणी शिक्षक कर्मचारी संघटना करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनकरिता मुख्य सचिव, वित्त सचिव, विविध शिक्षण संघटना, विरोधी पक्षनेत्यांना चर्चेत सामील करुन घेतले जाईल. शिक्षकांनी संप करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांना केले.

शिक्षक आमदार कपील पाटील यांनी ९७ अंतर्गत अल्पकालीन चर्चा परिषदेत घडवून आणली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सजेत पाटील, शशिकांत शिंदे, विक्रम काळे, सत्यजित तांबे, विक्रम काळे, अभिजीत वंजारी आदींनी जुन्या पेन्शन बाबत विधान परिषदेत सूचना केल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.