क्राईम

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त!

घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर करणाऱ्या विरोधात विशेष पथकाची कारवाई!
अकोला प्रतिनिधी:-२८डिसेंबर रोजी सकाळी१०वाजता दरम्यान अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, घरगुती सिलेंडरचा व्यवसायिक वापर होत असतांना, चार सिलेंडर जप्त करण्यात आले.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील आणि त्यांच्या चमूने केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खरप रोड वर गंगा नगर नंबर२ मध्ये उदयराम रामलाल पुरबिया सिध्देश्वर आईस्क्रीम वाला हा घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा वापर हा आईस्क्रीम कारखान्यात करीत असल्याचे गोपनीय माहिती, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली,त्या माहिती वरून नमूद ठिकाणी छापेमारी केली असता,नमूद इसम हा घरगुती सिलेंडरचा व्यवसायिक वापर करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून त्याच्या ताब्यातील भारत पेट्रोलियम कंपनीचे ४ घरगुती वापरासाठी सिलेंडर ,दोन गॅस शेगडी, दोन लोखंडी कढाई असा एकूण ४८,५००रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. उदयराम पुरबिया याच्या विरोधात जीवनावश्यक कायदा कलम३,७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, नमूद इसमाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.