क्राईम

जुने शहरातुन दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक!


अकोला प्रतिनिधी:-११ऑगस्ट,अकोला शहरातून गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून,अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीची घटना घडली होती. त्यावरून जुने शहर पोलीस ठाण्यात कलम ३७९नुसार अपराध क्रमांक८२०/२०२१नुसार गुन्हा दाखल होतात.अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने, त्यांच्या गोपनीय स्रोतद्वारे माहिती मिळवून,दुचाकी चोरणाऱ्या ६चोरट्यांना अटक केली. या कारवाईत फरजिनशेख नदीम अहमद,रा.हमजा प्लॉट,अकोला,उमेरखान अजीजखण,रा.हमजा प्लॉट अकोला,शेख तारीख शेख बशीर,रा.सोनटक्के प्लॉट अकोला,शेख रिहान शेख रशीद,रा.नावबपुरा,अकोला,शेख मोहित शेख अजीज रा.मुस्लिम कॉलनी भुसावळ,यांना अटक करून त्याच्याकडून१ लाख ४०हजार रुपये किंमतीच्या ३दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, या टोळीत एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून,त्याला समपुदेशन करण्यासाठी त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.महेंद्र बहादूरकर,जाकीरखान,पो.कॉ.शेख हसन,मोहम्मद नदीम,पो.कॉ.संतोष गावंडे,राज चंदेल,श्रीकांत पातोंड यांनी केली.