विद्यार्थी कॉग्रेस तर्पेâ जाहीर पाठिंबा
अकोट : १४मार्च पासून सुरु असलेल्या राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांच्या जुनी पेन्शन सुरु करण्यासाठी संपाला कॉग्रेस कमेटी चे जेष्ठ जिल्हा कार्याद्यक्ष महेश गणगणे यांचा मार्गदर्शनात विद्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी विद्यार्थी कॉग्रेस तर्फे जाहीर पाठिंबा दिला आहे.
यासाठी शासनाने जर चांगल्या पद्धतीने नियोजन केले तर शासन यावर योग्य तोडगा काढू शकतो. ज्याप्रमाणे राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली त्यासाठी शासनाने एक अभ्यास गट तिथे पाठवून अशी विनंती आम्ही शासनास करतो. परंतु शासन कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत नाही.
पेन्शन हे कर्मचार्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे त्यामुळे या जुन्या पेन्शन योजनेवर शासनाने दुर्लक्ष करू नये. याची त्वरित दखल घेण्यात यावी. जुनी पेन्शन योजना बंद करून शासनाने कर्मचार्यांचा वृद्ध काळातील आधार हिसकावून घेतला आहे. व आम्ही विद्यार्थी काँग्रेस तर्फे या संपाला जाहीर पाठिंबा देत आहोत.