क्राईम

जीवे मारण्याची धमकी देऊन,अल्पवयीन मुलीवर बलात्कार! बलात्कार करण्यासाठी मित्रानेच केली मदत!!

इस्लामपूर, 22 डिसेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) याठिकाणी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार (minor girl threat to death and raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या अल्पवयीन मित्र मैत्रिणींच नराधम आरोपीला मदत केल्याचा आरोप पीडित मुलीनं आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल  केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन साथीदारांना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत. मुस्तफा हुसेन पठाण (वय 23), खालीद मुसा मुल्ला (वय 20, दोघे रा. शिवनगर, इस्लामपूर) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित आरोपींची नावं आहेत. तर रोहन कुरणे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी पीडित मुलगी आपल्या घरी जात असताना मुस्तफा याने तिचा रस्ता अडवला होता. यानंतर याठिकाणी आलेल्या रोहन कुरणे यानं पीडित मुलीला आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत, तिला एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीनं या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. पण नऊ दिवसांपूर्वी आरोपीनं पीडित मुलीवर अशाच प्रकारे दुसऱ्यांदा बलात्कार केला आहे. आरोपीने पीडितेच्या अल्पवयीन मैत्रिणीला आणि तिला दुचाकीवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर आरोपी कुरणे आणि मुस्तफा याने पीडित मुलीला धमकी देऊन तिच्या घरी सोडलं होतं. हे प्रकरण पीडित मुलीच्या वडिलांना कळाल्यानंतर आरोपींनी तिच्या वडिलांना देखील धमकी दिली होती.  आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं अखेर इस्लामपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात कुरणेला पीडित मुलीची अल्पवयीन मैत्रीण आणि एका अल्पवयीन तरुणाने मदत केली. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. अल्पवयीन मैत्रिणीनेच रोहन कुरणे याच्याबरोबर जाण्यासाठी पीडित मुलीला  भाग पाडल्याचंही तिने तक्रारीत नमूद केलेआहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत