अकोला

जीवघेणा प्रवास,बोर्डी नदीवर पूलाअभावी अनेकदा तूटतो गावाचा संपर्क…

 

अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख गावातील प्रकार

अकोट : तालूक्यातील वडाळी देशमुख हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित आहे, विकासाच्या दृष्टीने मात्र जैसे थेच राहिले! या गावात कुठली सुधारणा झाली नाहीये. गावातीलच भाग असलेल्या छत्रपती शिवाजीनगर हे बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले आहे.

संपूर्ण मजूर वर्गाचा मुख्य गावाचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, गावकऱ्यांसह पालकांच्या खांद्यावर बसून येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदी पार करावी लागत आहे. छत्रपती शिवाजीनगर ते मुख्य गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर बोर्डी नदीवर अजून इथे गेल्या कित्येक वर्षापासून पुल बांधलाचं नाहीये.

त्यामुळ सातत्याने थोडासा पाऊस जरी झाला तरी नदिला पूर येतोय अन् येथील नागरिकांचा मुख्य गावाशी संपर्क तूटतो, दरम्यान, या नदीवर पणज इथे धरण बांधल्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी राहतो. तरीही या छत्रपती शिवाजीनगर आणि मुख्य गाव वडाळी देशमुख संपर्क बंद होतो. त्यामुळ विद्यार्थ्यांना नदीपार करून देताना पालकांना जीवघेणी कसरत करावी लागते.

शंभर ते १५० लोकांची आहे वस्ती?

कित्येक वर्षापासून छत्रपती शिवाजीनगर या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याच प्रकारची सोय सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यांना दैनंदिन जीवनासाठी लागणारे दळण किराणा वगैरे साहित्य हे कुठून आणावा, फार मोठा पेच निर्माण झाला आहे, तरीही एवढ्या या नदीच्या पुरामधून नागरिक दळण किराणाला मुख्या गावात जीव धोक्यात टाकून येत आहेत.

या विषयांवर आजपर्यंत कुठल्याच स्थानिक लोकप्रतिनिधिंनी निधी व छोटे खाणी पूल या ठिकाणी उभारले नाही. त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील शालेय नुकसान होत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी या बोर्डी नदीवर छोटा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी छत्रपती शिवाजीनगरातील नागरिकांची आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ये-जा करण्यासाठी पूलाअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना या नदीच्या पाण्यातून जीवघेणा शालेय प्रवास करावा लागतोय. या दरम्यान, कुठलीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील? असा सवाल छत्रपती शिवाजीनगरातील नागरिक प्रकाश काळे यांनी उपस्थित केला आहे.

आतापर्यत सर्व नागरिकांना कुठल्याच प्रकारची शासनाची सोय-सुविधा, ना कुठल्याच लोकप्रतिनिधी आमच्याकडे फिरकला नाहीये, मात्र मतदानाच्या प्रसंगी आम्हाला बोर्डी नदीवर पुल उभरण्यासाठी पूल निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन देतात, असेही राजकुमार खोबरखेडे या गावकऱ्याचे म्हणणे आहे.

स्वप्निल सरकटे