विदर्भ

जि. प.शाळेच्या आवारात पाणीच पाणी

माझोड दि.२७- अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या माझोड येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणीच पाणी साचलेले आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप शाळा समिती अध्यक्ष हिरळकार यांनी केला आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सदर पाण्याची विल्हेवाट लावावे अशी मागणी आहे. त्यामुळे शुक्रवारी सरपंच बोबडे, उपसरपंच शिवलाल ताले, ग्रामसेविका मधूशिला डोगरे, सदस्य विपुल खंडारे, रवींद्र खंडारे,गजानन निलखन, पंकज खंडारे आदींनी पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापक राजेश मेश्राम व सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. अंगणवाडी सुध्दा शाळेच्या आवारातच असल्यामुळे सदर पाण्याची विल्हेवाट त्वरित लावावी अशी मागणी आहे.