भर (जहागिर) सर्कल मधील शेलु(खडसे),मोप,गणेशपुर या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप !
रिसोड प्रतिनिधी११ ऑक्टोबर:-रिसोड तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या भर जहागिर जिल्हा परिषद सर्कल मधील शेलुखडशे,मोप,गणेशपुर येथिल मतदान केंद्रावर काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याची शक्यता वर्तवलीत वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा रविंद्र देशमुख यांनी निवाशी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या कडे लेखी तक्रार दिली आसुन बोगस मतदानाचा निषेध व चौकशी साठी ता.14 ऑक्टोबर रोजी भर जहागिर येथे रस्ता रोको करण्याचा ईशारा दिला आहे.
*भर जहागिर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत शेलुखडशे,मोप,गणेशपुर या तीन गावामध्ये बऱ्याच प्रमाणात बोगस मतदान झाल्याने सखोल चौकशी करण्याची मागणी वंजित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख यांनी नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.*
वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीच्या वतीने तक्रार देन्यात आली आहे,की भर जहागिर जिल्हा परिषद सर्कल मधील पोट निवडणूक मध्ये अटीतटीच्या निवडणूकी मध्ये शेलुखडशे,गणेशपुर,मोप या गावातील काही मयत मतदार व बाहेर गावी आसलेल्या व्यक्ती आणि काही शासकिय नोकरीत बाहेर गावी आसलेल्या व्यक्तीं मतदान केंद्रावर हजर नसतांनी सुध्दा बोगस मतदान करून घेतल्याची शक्यता आहे.शेलुखडशे येथिल मतदान केंद्रावरील गोंधळाच्या घडलेल्या परिस्थिती ची तक्रार निवाशी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना भ्रमणध्वनी द्वारे सुचना केली होती.तेव्हा काही प्रमाणात शेलुखडशे मतदान केंद्रावर वातावरण कडक करण्यात आले होते.तरी सुध्दा त्या ठिकाणी बोगस मतदान करून घेतल्याची शक्यता आहे.कारण शेलुखडशे येथिल मतदान केंद्रावर झालेली मतदानाची टक्केवारी 83 टक्केवारी च्या आसपास दिसत आहे.ही मतदानाची टक्केवारी आता पर्यंत च्या निवडणूका मधील उच्चांक गाठलेला दिसत आहे.तरी महोदय आमच्या रितसर तक्रारीची दखल घेत योग्य कारवाई करावी अन्यथा भर जहागिर येथे ता.14 ऑक्टोबर रोज गुरूवारला वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करण्यात येनार आहे.निवाशी जिल्हाधिकारी शैलेश हींगे यांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणविस,राज्य निवडणूक आयुक्त मा.उरविंदर पाल सिंग मदान अमरावती आयुक्त पियुष सिंह.जिल्हा पोलिस अधीक्षक वाशीम,रिसोड तहसीलदार, ठाणेदार यांना प्रतिलिपी तक्रार दिली आहे.या रास्ता रोको आंदोलनाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहण वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख यांनी केले आहे.