Rabdidevi-residence
देश

जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे पथक बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी…

जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआय राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. याप्रकरणी राबडी, लालू यादव आणि मिसा यादव यांना १५ मार्च रोजी हजर केले जाणार आहे. राबडी देवी यांची सध्या सीबीआय चौकशी करत आहे.

पाटणा : सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या बिहारमधील निवासस्थानी पोहोचले आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआय इथपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. राबडी देवी यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी राबरी, लालू यादव आणि मिसा यादव यांना १५ मार्च रोजी हजर केले जाणार आहे. सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही घरात होते. सीबीआयच्या टीमला अचानक पाहून सगळेच अवाक् झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, राबडी देवी यांच्या घरावर हा छापा नसून, लँड फॉर जॉब घोटाळ्याच्या पुढील चौकशीसाठी सीबीआयचे पथक आले आहे. मे 2022 मध्ये, सीबीआयने रेल्वेच्या ‘नोकरीसाठी जमीन’ घोटाळ्यात एफआयआर नोंदवला होता.

लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे खात्यात नोकरी मिळण्याऐवजी जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ही बाब 2004-2009 मधली आहे, जेव्हा लालू रेल्वे मंत्री होते. सीबीआय एफआयआरमध्ये लालू, पत्नी राबडी, मुलगी मीसा आणि हेमा यांची नावे आहेत. एफआयआरमध्ये 12 जणांची नावे आहेत ज्यांना जमिनीच्या बदल्यात कथितरित्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

लालू प्रसाद यांनी एका षड्यंत्राखाली लोकांकडून अत्यंत कमी दरात त्यांच्या कुटुंबाच्या नावावर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. लालू यादव यांचा जवळचा सहकारी भोला यादव याला सीबीआयने जुलै २०२२ मध्ये अटक केली होती. सीबीआयची ही कारवाई भाजप प्रायोजित आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे आरजेडीचे म्हणणे आहे.

दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि इतर १४ जणांविरुद्ध कथित जमीन-नोकरी प्रकरणात समन्स जारी केले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने आरोपींना १५ मार्चला समन्स बजावले आहेत.