saurav-garg
देश

छतरपूर : बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल

छतरपूर, 21 फेब्रुवारी :  बागेश्वर धाम येथील पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा धाकटा भाऊ सौरव उर्फ ​​शालिग्राम गर्ग याच्याविरुद्ध बामिठा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत सौरवने गावातच एका दलित मुलीला हातात पिस्तूल घेऊन धमकावले होते. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या व्हिडिओच्या तपासानंतर बमिठा पोलिस ठाण्यात सौरव गर्गविरुद्ध SAC-ST कायदा आणि इतर फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खजुराहो एसडीओपी मनमोहन बघेल यांनी याला दुजोरा दिला आहे.