महाराष्ट्र

चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीची माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना नोटीस!

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,अटक होण्याची शक्यता? 

मुंंबई १७ऑगस्ट : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना१८ऑगस्ट रोजी चौकशी साठी ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यासाठी ईडीच्या कार्यलयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांना चौकशी झाल्यावर ईडीच्या तपास पथकाला ते दोषी आहेत असे वाटल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मनी लॉड्रिंग प्रकानात अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी ईडीने त्यांच्यावर केलेल्या मणी लाँड्रींग प्रकरणात अंतरीम संरक्षण देऊन आपणास अटक करू नये,अशी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून लावल्याने,उद्या चौकशीसाठी गेल्यावर अनिल देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. ईडीसमोर चौकशीसाठी जाण्याशिवाय देशमुख यांच्या पुढे कोणत्याही प्रकारचा पर्याय शिल्लक राहिला नसल्याने, चौकशीला सामोरे जाणे निश्चित झाले आहे. त्यामुळे देशमुख यांना ईडी अटक करणार आहे का?शेवटचा प्रयत्न म्हणून ते अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतील का,अशीही शक्यता नाकारता येत नाही.ईडीने अनिल देशमुख यांच्यावर खासगी बँकांकडून नियमबाह्य कर्ज घेणे,नमूद कर्ज मिळवून देण्यासाठी कोणत्याही लोकांनी मदत केली?तसेच नियम धाब्यावर बसवून घेतलेलं कर्जाची रक्कम आपले नातेवाईक यांच्या कंपन्यांच्या खात्याकडे वळती केली,तसेच यातील काही कंपन्या बनावट आहेत, तसेच ज्या कंपन्यांना ही कर्जाची रक्कम दिली, त्या रकमेचे पुढे काय झाले,अशा प्रकारचे आरोपी ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ठेवले आहेत. शिवाय अनिल देशमुख यांचे अटकेत असलेले स्वीय सहाययक संजीव पलांडे यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी मोठया आर्थिक रकमा घेतल्या ,शिवाय ४मार्च रोजी ज्ञानेश्वर री बंगल्यात आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांच्या माध्यमातून मुंबईतील बार व्यवसायिक यांच्याकडून १००कोटी रुपये जमा करून देण्यासाठी परमवीर सिंग यांना सांगितल्याची माहिती,अटकेत असलेले अनील देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे याने दिलेल्या जबाबात दिली आहे.