अकोला: पूज्य सिंधी जनरल पंचायत अंतर्गत झुलेलाल महोत्सव समितीच्या वतीने सिंधी समाजाचा सर्वात मोठा सण असणार्या चेट्री चंड उत्सव गुरुवार दिनांक २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने समितीच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सकल सिंधी समाज २८ वा श्री झुलेलाल जयंती महोत्सव साजरा करीत आहे.या उत्सवाचा प्रारंभ पूज्य सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष कन्हैयालाल रंगवानी,शोभराज राजपाल यांच्या हस्ते संत कवरराम तथा श्री झुलेलाल यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला.यावेळी मशाल रॅली काढण्यात आली. सिंधी कॅम्प परिसरातील आदर्श संस्थेच्या प्रांगणातून ही नागरिकांची मशाल रॅली प्रारंभ होऊन संत कवरराम पुतळा प्रांगणात या रॅलीचे भक्तिभावात समापन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण, १७ मार्च २०२३ Click Here
संजय नागदेव यांच्या नियंत्रणात यात रिषि पारवानी,यशराज पोपटानी, आकाश मखीजा, राम शाखानी,नीलेश लचवानी,वैभव नागदेव, आदर्श पंजवानी, हर्षदीप मिरानी आदी सहभागी झाले.दरम्यान या उपक्रमात सिंधी युवकांची व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली. समाजसेवी कन्हैयालाल आहुजा यांनी नारळ फोडून या स्पर्धेचा प्रारंभ केला तर नाणेफेक हिरालाल कृपलानी यांनी केली.
यावेळी मंचावर श्री झुलेलाल महोत्सव समितीचे सल्लागार हिरालाल कृपलानी, सुरेंद्रभाई नागदेव, कन्हैयालाल आहुजा,प्रकाशभाई खबरानी, ब्रह्मानंद वलेचा,झुलेलाल महोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार आहुजा, महासचिव जगदीश जेठानी, कोषाध्यक्ष धीरज बसंतवाणी,सहकोषाध्यक्ष रवी मेठानी आदीं पदाधिकारी उपस्थित होते.या व्हॉलीबॉल स्पर्धेत सन्नी शूटर,अशोका वॉरियर,जतिन स्टार्स,डायनामिक स्पाशर,डॉट कॉम,एनआरएफ आदी चमू सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेत जतिन स्टार ही जम्मू विजेता ठरली,तर उपविजेता डायनामिक स्मॅशर ही चमु ठरली.
विजेत्या चमुस अनिल मोटवानी यांच्या वतीने पंधरा हजार रुपये व ट्रॉफी हे प्रथम पारितोषिक देण्यात आले.तर उपविजेता चमूस ओम ज्वेलर्सच्या वतीने अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी सहभागी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह प्रदान करून शु मॉलच्या वतीने टी-शर्ट बहाल करण्यात आलीत. संचालन मधू लखवाणी,करिष्मा वासरानी यांनी तर आभार ब्रह्मानंद वलेच्या यांनी मानलेत. या उपक्रमात कपिल पारवाणी यांच्या नियंत्रणात मॅरेथॉन घेण्यात आली. तर दिनांक १७ मार्च रोजी सायं ७ वाजता संत कवरराम प्रांगण सिंधी काम येथे सौ कशीश भाटिया यांच्या नियंत्रणात गरबा रास आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १८ मार्च रोजी सायं ७ वाजता संत कवरराम प्रांगण येथे सौ प्रिया केशवानी यांच्या नियंत्रणात सिंधी नाटिका होणार आहे. दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बाबा हरदासराम भवन येथे लक्ष्मण पंजाबी तथा रोशन राज यांच्या नियंत्रणात भव्य रक्तदान शिबीर तथा राजेश चावला यांच्या नियंत्रणात आरोग्य शिबिर व साय. ४ वाजता एसएस डी धाम येथे रिया जेठानी यांच्या नियंत्रणात महिलांसाठी मेंहदी स्पर्धा तर सायंकाळी ७ वाजता संत कव राम प्रांगण येथे मुकेश फुलवाणी यांच्या नियंत्रणात सिंधी मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात मुंबईचे टीव्ही कलाकार दीपक वाटवानी हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
दिनांक २० मार्च रोजी सायं.७ वाजता संत कवरराम प्रांगण येथे विशाल मनवानी यांच्या नियंत्रणात फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. दिनांक २१ मार्च रोजी दुपारी ३-३० वाजता झुलेलाल वाटिका हिराबाई लेआउट येथून महिलांची भव्य कलश यात्रा निघणार असून या कलश यात्रेचे निमवाडी येथे समापन होणार आहे.