rape
क्रीडा

चित्रपटात रोल देण्याचे अमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार

सोलापूर : मी तुला चित्रपटात चांगले रोल देणार असून त्याकरिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत दिग्दर्शकाने अत्याचार केल्याची फिर्याद अभिनेत्रीने दिली आहे. याप्रकरणी दिग्दर्शक संजय पाटील (वय ५०, रा. बोलेगाव फाटा, नागापूर एमआयडीसी, अहमदनगर) याच्यावर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार २० सप्टेंबर २०२२ रोजी एका चित्रपटाच्या कार्यशाळेप्रसंगी एका महाविद्यालयात घडला. चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी अभिनेत्री या येडसी (जि. धाराशिव) येथे गेल्या होत्या. एका महाविद्यालयामध्ये चित्रपटाचा स्टाफ हा मुक्कामासाठी थांबला होता.

२० सप्टेंबर रोजी रात्री नउच्या सुमारास दिग्दर्शक पाटील याने अभिनेत्रीस मोबाईलवर फोन करून रूममध्ये बोलावून घेतले. तेथे अभिनेत्री गेल्यानंतर मी तुला चित्रपटात चांगले रोल देणार आहे, त्या करिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत अत्याचार केल्याची फिर्याद पीडित अभिनेत्रीनी दिली आहे. त्यावेळी मला कामाची गरज होती. जर मी तक्रार दिली असती तर मला काम मिळाले नसते. त्यामुळे घाबरून मी कोणालाही काही सांगितले नसल्याचेही पीडितेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.