क्राईम

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने पोलीस आयुक्तलयात आत्मदहन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू!

पुणे १९ऑगस्ट:-पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत येत असलेल्या खडकी(औंध मार्ग पाडळे वस्ती)येथे रहिवासी असलेल्या एका४२वर्षीय व्यक्तीने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने, पुणे पोलीस आयुक्त कार्यलयाच्या आवारात आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना घडली. सुरेश विठ्ठल पिंगळे अशा आत्मदहन करून मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, सुरेश विठ्ठल पिंगळे यांनी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीसाठी खडकी पोलीस ठाण्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु पिंगळे यांच्या नावावर कोथरूड समर्थ नगर आणि सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे.पुणे पोलीस आयुक्त कार्यलयात कोथरूड आणि समर्थ नगर पोलीस स्टेशनचा अहवाल आला होता, परंतु सहकार नगर पोलीस ठाण्याचा अहवाल आला नव्हता.पिंगळे हे १८ ऑगस्ट बुधवारी सकाळी चरित्र पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यलयात गेले असता,त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही.आपण एवढया दिवसांपासून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र साठी आयुक्त कार्यलयाच्या चकरा मारतो, हे त्यांना सहन न झाल्याने सुरेश पिंगळे यांनी आयुक्त कार्यलयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून कोणाला काही कळण्याची आधी पेटवून घेतले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर पिंगळे,पोलीस आयुक्त कार्यलयात प्रवेश दारातून घुसले,तेव्हा उपस्थित पोलिसांनी त्यांना विझवुन, पिंगळे यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंगळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना खाजगी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पिंगळे यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.