क्राईम

चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, ‘सर्किट’ पतीच्या विकृतीचा कळस संशयाच्या भूतान पछाडलेल्या पतीने,पत्नीचं गुप्तांग सुईदोऱ्याने शिवले!

 

 

 भोपाळ२८ऑगस्ट:-पत्नीला आपली उपभोगाची वस्तू आणि गुलाम समजल्या जाणाऱ्या समाजात, संशयाच्या भूतान पछाडलेल्या एका पतीने, तुझे पर पुरुषांच्या सोबत शारीरिक संबंध आहेत, असा आरोप करीत, विकृत पतीने, चक्क पत्नीचे गुप्तांग सुईदोऱ्याने शिवल्याची किळसवाणी आणि तितकीच घृणास्पद घटना मध्यप्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील माडा पोलिस ठाण्याच्या  हद्दीत घडली,आरोपी पतीने त्याच्या पत्नीवर संशय घेत होता,त्यावरून तो पत्नीचा शारीरिक व मानसीक छळ करायचा, शेवटी त्याने पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असल्याच्या संशयाचे मनात घर करून, पत्नीचे गुप्तांग सुईदोऱ्याने शिवून काढीत विकृतीचा कळस गाठला. शेवटी पत्नीची छळ सहन करण्याची सहनशक्ती संपल्याने,तिने याप्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.पीडितीने दिलेल्या माहितीनुसार, “संशयाने पतीला आंधळं केलं होतं. याच संशयातून त्याने आपल्या मर्यादा ओलांडत सुई-दोऱ्यानं गुप्तांग शिवलं.” पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पतीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. हे कृत्य अत्यंत निर्दयी , अमानवीय आणि पीडितेला भयंकर त्रास देणारं आहे, असं मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केलंय. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करुन घेतली आहे. या अहवालानंतरच आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी पती फरार असून पोलीस त्याच्या शोधासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी वेगवेगळे पथक गठीत करून,मध्यप्रदेश आरोपी पतीचा युध्द पातळीवर शोध घेत आहेत.