chavdar-tale-mahad
कोकण ताज्या बातम्या

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 20 : चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

“चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी सांगितले.