देश

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर 25 रूपयांनी महागले

 

17 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडर नवे दर लागू

नवी दिल्ली, न्यूज डेस्क:-१८ऑगस्ट घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर२५रुपयांनी महागले असून,गृहिणीच्या घरगुती बजेट कोलमडून जाणार आहे. घरगुती सिलेंडरच्या नवीन दर१७ऑगस्ट २०२१पासून लागू करण्यात आले आहेत. वाढीव किंमती नुसार मुंबईत१४.२किलोग्रॅम सिलेंडरची किंमत८३४.५०रुपये होती वाढीव किंमती नुसारहेच सिलेंडर८५९.५०रुपये इतकी असेल,कोलकाता येथे हेच सिलेंडर८८६रुपये इतकी असेल,दिल्ली मध्ये हेच सिलेंडर८५९.५०रुपये एवढी असेल.प्रत्येक राज्यात सिलेंडर चे दर ऑइल कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी निर्धारित करण्यात येत असते.यापूर्वी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत जुलै२०२१रोजी वाढ झाली होती. जुलै२०२१रोजी सिलेंडर८३४रुपयांना मिळत होता१जानेवारी ते१७ऑगस्ट२०२१दरम्यान सिलेंडर ची किंमत तब्बल १६५रुपयांनी वाढली आहे.