अकोला

ग्राम कंझरा येथे अग्नितांडव मुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांना आमदारांचा मदतीचा हात

मुर्तिजापूर : ग्राम कंझरा येथे आग लागल्यामुळे शेतकरी प्रकाश शामराव पांगशे यांच्या ६४ शेळ्या तसेच सेट्रींग व विनोद जानराव सरतांबे यांचे कुटार तसेच गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले याची माहिती मिळताच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीष पिंपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्तांचे सांत्वन करून आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेमार्फत प्रकाश शामराव पांगशे यांना टिन पत्रे व लोखंडी ? गल व आर्थिक मदत तसेच विनोद जानराव सरतांबे यांना आर्थिक मदत केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, जोगदंड गुरुजी, गोपाल दायमा,मनोज पारस्कर भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर, शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष महल्ले, बुथप्रमुख सुरेश नागोलकर, सरपंच अनिताताई टोम्पे यांची तसेच ग्राम कंझरा येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती.