Panchganvya-medicine
अकोला

गोवंश संवर्धन काळाजी गरज;वैज्ञानिकांचे सूर

अकोला:  ‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळेत पंचगंव्य औषधी व गोआधारित पदार्थांचे महत्व व त्याचे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात होणारे फायदे याबाबत वैज्ञानिकांनी मार्गदर्शन केले. तसेच विषजन्य औषधी व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रीय शेती व पंचगंव्य औषधीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवंश सवंर्धन करणे हे काळाजी गरज आहे, असा सूर वैज्ञानिकांनी कार्यशाळेत लावला.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील सेमिनार हॉल येथे प्रशिक्षण कार्यशाळाचे उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, भारतीय पशुकल्याण बोर्डचे सदस्य सुनिल मानसिंहका, आदर्श गोसेवा एंव अनुसंधान प्रकल्प म्हैसापूरचे विवेक बिडवाई, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पुशविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.डि.जी. दिघे, प्रकल्?प संचालक डॉ. प्रशांत कपले, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा(आत्मा) प्रकल्प संचालक आरिफ शहा आदि उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यशाळेत सुनिल मानसिंहका यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली तर त्यांचा परिणाम मानवी आरोग्य व जमिनीच्या सुपिकतेवर होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्यवर्धक जीवनमानाकरिता सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. तसेच गायीपासून उत्पादित होणार्‍या पंचगंव्य औषधी व गो आधारित पदार्थांचा वापरामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईलच शिवाय निरोगी राहण्यास मदत होईल.

या प्रशिक्षण कार्यशाळेचा सर्व शेतकरी, पशुधन, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गोआधारित संशोधनावर भर देण्याची आवश्यक असून पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. पंचगव्य औषधीवर केलेले संशोधन नागरिकापर्यंत पोहोचवा. धार्मिक व आर्युवेदिक शास्त्रात पंचगव्य औषधीचे महत्व सांगितले आहे. त्याचा वापर प्रत्येकांने करणे हे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अजय पोहरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवात दिपप्रल्वलन करुन झाली.

त्यानंतर ‘आधुनिक काळात पंचगव्याचे उपयोग आणि सदृढ आरोग्याचे महत्व’ या घडीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्?प संचालक डॉ. प्रशांत कपले यांनी केले. सुत्र संचालक मनिष इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दिलीप बदुकले यांनी केले. गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. पंचगव्य गोमातेने आपल्या पुर्वजांना व संपूर्ण मानवजातीला दिलेली एक औषधी देणगी आहे.

प्राचीन काळापासून गोमूत्राचा उपयोग मानवाच्या विविध आजारांवर उपचार किंवा शुद्धीकरण म्हणूनही केला जातो. याचा वापर विविध त्वचारोग, पोटाचे आजार, ह्रदयविकार, किडनीचे आजार, क्षयरोग, लठ्ठपणा, उतारा, अँटीफ्लाट्युलेंट, जलोदर अशा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी गोमूत्र आणि शेणाचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. अनेक संशोधकांनी विविध परिस्थितींसाठी गोमूत्र डिस्टिलेट थेरपी वापरली आहे आणि ते वेदनाशक म्हणुन उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

पाणी ९५ टक्के, मूत्र खनिजे २.५ टक्के, मीठ हार्मोन्स एन्झाइम्स २.५ टक्के. युरीया-प्रथिने चयापचय उत्पादन, मजबूत प्रतिजैविक एजंट, युरिक ?सिड- प्रतिजैविक क्रिया कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, नायट्रोजन- लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ व मूत्रपिंड उत्तेजित करते. सल्फर- रक्त शुद्ध व आतड्यासंबंधी पेरिस्टॉलिसिस वाढवते. तांबे- चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवते, लोह- रक्तातील आरबीसीचे उत्पादन वाढवते, सोडियम- रक्त शुद्ध व हापर ? सिडिटी नियंत्रीत करते. पोटॅशियम- क्षुधावर्धक व स्नायूंचा थकवा दूर करते. तर अन्य क्षार- बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व केटोआसिड्रस प्रतिबंधित करते.गाईचे शेण हे गाईच्या खालेल्या अन्नपदार्थाचे न पचलेले अवशेष आहे. ज्यामध्ये विष्ठा आणि लघवी, लिग्निन, सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हि प्रमुख रचना आहे. गायीच्या शेणाचा वापर जैव खत म्हणून केला जातो. जैविक शेतीच्या संवर्धनासाठी आणि आरोग्यदायी अन्नधान्य निर्मितीसाठी गायीचे शेण अत्यंत उपयुक्त आहे.