क्राईम

गोळीबार करून चाकूने वार; सराफाला लुटले एक ठार

संतोष आढाव:-२२डिसेंम्बर ,मालेगांव येथील सराफा व्यवसायी योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे २१ डिसेंबर च्या रात्री दुकान बंद करून, घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला.योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांनी चाकूने वार करून गोळीबार केला आहे.मालेगाव शहरात एका ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला करून लुटण्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि चाकूने वार करून ज्वेलर्स मालकाला लुटले आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्स हे दुकान बंद करून योगेश अंजनकर आणि त्यांचा सहकारी रवी वाळेकर हे दोघे रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घरी जात होते.योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये योगेश अंजनकर यांचा सहकारी रवी वाळेकर यांचा चाकू व गोळी लागून मृत्यू झाला. तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.गंभीर जखमी झालेल्या रवी वाळेकर यांना वाशिम येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे तर योगेश अंजनकर यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अज्ञात चोरट्यांची मोटरसायकल घटनास्थळी आढळून आली. घटनास्थळी सापडलेली मोटार सायकल चोरीची असल्याचं समजते.घटनास्थळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल आहेत. मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली असून नागरिकांची सुरक्षा ही धोक्यात आली आहे

 या प्रकरणाची माहिती मिळाल्याबरोबर खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, व आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल यांनी तातडीने अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासह राज्याचे गृहमंत्री ,राज्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून त्वरित कारवाई करून दरोडेखोरांना अटक करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.