goregaon-akola-sarpanch
अकोला

गोरेगावच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पारीत

मूर्तिजापूर: या तालुक्यातील नऊ सदस्यीयगोरेगाव (सांजापूर) ग्राम पंचायतीच्या सरपंचाविरूद्ध उपसरपंचासह आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बुधवारी (ता.२२) पारीत झाला.

सरपंच यशोदा देवानंद सरदार हे ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, पदाचा दुरूपयोग करतात, विकास कामे न करता त्यात अडथळे आणतात, त्यांचे पती ग्राम पंचायतीच्या कामात हस्तक्षेप करतात, ग्राम पंचायतीच्या कामकाज रजिष्टरवर खोडतोड करतात, असे नमुद करणारा अविश्वास प्रस्ताव उपसरपंच शेख निखत अंजुम फयानोदीन यांच्यासह रेखा जगन्नाथ सरदार, शुभांगी निलेश पातोंड. सविता सिद्धार्थ सरदार, विजय शंकरराव डोईफोडे, राजेश माणिकराव पिसाट, सुभाष विश्वास सरदार, अमोल भुजंगराव सरदार या सदस्यांनी बुधवारी (ता.१५) तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे दाखल केला होता.

यासंदर्भात गोरेगाव ग्राम पंचायत कार्यालयात बुधवारी (ता.२२) दुपारी २ वाजता विशेष सभा संपन्न झाली. उपसरपंचासह ८ सदस्यांनी हात वर करून प्रस्तावाच्या बाजुने मतदान केले व प्रस्ताव पारीत झाला. सरपंच यशोदा सरदार या सभेला अनुपस्थित होत्या. अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार प्रदीप पवार यांनी सभेचे कामकाज पाहिले तर महसूल सहाय्यक विजय पुंडे ग्रामसेवक बालाजी बडगे यांची उपस्थिती होती.