अकोला

गुन्हे करणारी टोळी अकोला जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार

अकोला: अकोला जिल्हा अंर्तगत टोळीने गुन्हे करणार्‍या गुन्हेगारी टोळयांवर आळा बसावा याकरीता पो.स्टे. खदान चे प्रभारी अधिकारी यांनी पो.स्टे. खदान हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार नामे (१) आशिष ईश्वर लोध्या, वय २५ वर्ष, (२) पुर्वेश राजेश शाह वय २८ वर्षे, (३) शिवम विरेंद्रसिंग ठाकुर सर्व रा. राधाकिसन प्लॉट, अकोला यांचेवरील गुन्हयांची मालिका पाहता त्यांचे विरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्हयातुन २ वर्षा करीता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधिक्षक सा. अकोला यांचे कडे सादर केला होता.

त्या अनुषंगाने आज दि. २७/०२/२०२३ रोजी मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. संदिप घुगे जिल्हा अकोला यांनी नमुद गुन्हेगार यांना अकोला जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार केल्याबाबत आदेश पारीतकेले असुन नमुद ०२ गुन्हेगारांना अकोला जिल्हयातुन दोन वर्षा करीता हद्दपार करण्यात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. संदिप घुगे यांनी अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी टोळयांची माहिती संकलीत करण्यात आदेश दिले असुन त्यांचे विरुद्ध वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरु आहे.