अर्थ

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने महागले!

अकोला: काही दिवसावरच गुढीपाडवा असताना सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल आहे. अशात सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस तेजी दिसून येत आहे. आजही सोन्याच्या दरात तेजी दिसून आली.गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार २२ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ५५,३०० रुपये तर २४ कॅरेट साठी ६०,३२० रुपये आहे तर आज १० ग्रॅम चांदी ७२१ रूपये आहे.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेटवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात. सोने २४ कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अ‍ॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.