अमोल रासकर, वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-२४सप्टेंबर:-बनावट आयकर अधिकारी बनून अक्षरशः विविध श्रीमंत लोकांच्या घरी धाड टाकण्याचे नाटक करत लूटमार करण्याचे प्रकार करून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या रिसोड येथील डॉक्टर अल्लामा इक्बाल उर्दू हायस्कूलचा शिक्षक इरशाद अहमद ला अटक करण्यासाठी गुजरातच्या दाहोद पोलिसांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 20 सप्टेंबर रोजी शाळा व इरशाद अहेमद च्या घराची झडती घेतली. मात्र आरोपी पसार होण्यास यशस्वी झाला.याबाबत सविस्तर वृत्त असे की शिक्षक इरशाद अहेमद याने रिसोड शहर व तालुक्यातील आपल्या काही साथीदारांसोबत मिळून नकली ओळखपत्र बनवून आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचा बनाव करीत गुजरातच्या दाहोद मधील काही श्रीमंत लोकांच्या घरी धाडी टाकल्या.धाडी दरम्यान घराची झडती घेण्याचे नाटक करत चक्क तिजोरी, कपाटातले रोख रक्कम आणि दागिने पळविण्याचा काम सुद्धा या टोळीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर ,दाहोद पोलिसात विविध प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले.एका ठिकाणी अशाच प्रकारची धाड टाकली असता मात्र गुजरात पोलिसांनी त्यांचा भांडाफोड केला व यातील दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली. मात्र इरशाद अहमद तिथून पसार होण्यास यश झाला असल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली.त्यानंतर या प्रकरणात इरशाद अहेमद आरोपी करण्यात आले. इरशाद शोध घेण्यासाठी दाहोद पोलीस 20 सप्टेंबर रोजी रिसोडात दाखल झाली होती. गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याबाबत कबुली दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.