जनतेला सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी सरकार कटिबद्ध-आ. रणधीर सावरकर
अकोला : जनतेला सुविधा उपलब्ध करून देणे व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे या यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना सरकार कटिबद्ध असून गांधीग्राम पुलाचे काम व पर्यायी व्यवस्था नामदार गडकरी नामदार फडणवीस खासदार धोत्रे यांच्या प्रयत्नाने यशस्वी होऊन या पंचक्रोशीतील जनतेला उपयोगी पडणारा रस्ता जनतेला खुले करण्यात आनंदी क्षण असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
गांधीग्राम पूर्ण नामदार नितीन गडकरी आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी प्रयत्न करून जनतेच्या सुविधेकरिता चार कोटी रुपयाचा तात्पुरता पूल मंजूर करून एक महिन्यात दुचाकी वाहन तसेच दुचाकी वाहन साठी समर्पित करण्याचा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अनुप धोत्रे वसंत बाछुका, तेजराव थोरात विजय मालोकार राजेश बेले संतोष शिवरकर विवेक भरणे राजेश नागमते गजानन नळे मधुकर पाटकर माधव मानकर रमेश आप्पा खोबरे , गणेश तायडे दिलीप पटोकार, किशोर कुचके किशोर सरोदे, भूषण भूषण बाजारे, डॉक्टर किशोर ठाकरे, गणेश लोड, गणेश पोटे, आधी प्रामुख्याने उपस्थित होते कामाच्या संचालन अभियंता अडचुले यांनी केले.
गांधीग्राम येथील वाहतुकीसाठी व त्यामध्ये पुलामध्ये बिघाड झाल्यामुळे आमदार रणवीर भाऊ सावरकर यांनी अकोट अकोला रेल्वे सुरू केली तसेच नामदार गडकरीकडे पुरावा करून पाठपुरावा करून चार कोटी रुपये तसेच गोपालखेड याबाबत या भागातील सात फुलांसाठी पोहोच रस्त्यासाठी विशेष निधी तसेच शेतकर्यांची जमिनी भूसंपादन शेतकर्यांची संवाद अधिकार्यांशी पाठपुरावा करून या भागातील तसेच अकोट तेलारा वारी मध्य प्रदेश दर्यापूर अचलपूर या भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दहीहंडा केळीवेळी या भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच आर्थिक बचत मानसिक त्रास वेळेची बचत यासाठी ताबडतोब अधिकार्यांना निर्देश देऊन रस्त्याचे काम त्वरित केले त्यामुळे आज जनतेला दुचाकी वाहनासाठी रस्ते खुले करण्यात आले.
आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार गोवर्धन शर्मा यांच्या सहकार्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला असून जनतेच्या समस्या निराकारण्यासाठी कार्यरत आहे.यावेळी नंदकिशोर राठोड श्रीकांत गाडेकर गिरीश जोशी अक्षय जोशी मोहन पारधी राजेंद्र ठाकरे विकास वाघ प्रशांत पोरे माधव बकाल अतुल आवारे गजानन भागवत पवन वर्मा मंगेश तायडे दत्तू पाटील गावंडे विशाल आवारे गणेश चाकोते मनोहर चाकोते विठ्ठल वाकोडे किशोर घुले पुरुषोत्तम नळे श्रीकृष्ण चव्हाण अभिमन राजेश्वर वराळे विनायक विराळे गोपाल भामरे चंद्र हर्ष भामरे विनायक भटकर चंदू खडसे सुभाष रायबोले रामेश्वर भटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.