अकोला

गांजाची शेती केल्याप्रकरणी शेतकऱ्याला अटक!

माना पोलीस व मूर्तिजापूर महसूल विभागाची सयुक्तिक कारवाई!

!

अजय प्रभे मुर्तिजापूर प्रतिनिधी:-अकोला जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजाची लागववड केल्याप्रकरणी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.दीपक दयाराम गवई, वय५८वर्षे, रा.कवठा(सोपीनाथ)ता.मूर्तिजापूर जि. अकोला ,असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.मूर्तिजापूर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, मौजे कवठा(सोपीनाथ)येथील शेतकरी दिपक दयाराम गवई, यांनी त्यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत यांना ९ नोव्हेंबर२०२१रोजी सकाळी मिळाली, त्या माहितीच्या आधारे ,नमूद प्रकाराची माहिती मूर्तिजापूर तहसीलदार यांना ठाणेदार कैलास भगत यांनी दिली. त्यावरून नायब तहसीलदार बनसोड,माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस कर्मचारी यांनी दोन पंच सोबत घेऊन, दीपक गवई यांच्या शेतात जाऊन,पाहणी केली असता,शेतात४५गांजाची झाडे आढळुन आले,सदर ठिकाणी पंचासमक्ष पंचनामा करून,ती झाडे ताब्यात घेण्यात आली, त्यानंतर दिपक गवई यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता, घरासमोर सुद्धा४गांजाची झाडे मिळून आली, या सर्व गांजाचे वजन २किलो५४०ग्राम असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले आहे.या प्रकरणी दिपक दयाराम गवई या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई माना पोलिस आणि मूर्तिजापूर महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केली आहे.