क्राईम

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, मृतकाची ओळख पटविण्यासाठी पातूर पोलिसांचे आवाहन

प्रमोद कढोने पातूर १०डिसेंबर : अकोला ते वाशिम रोडवर पातूर पासून 5 किमी अंतरावर असलेल्या चिंचखेड शिवारात वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जंगलामध्ये एका महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.१० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी११  वाजताच्या दरम्यान पातूर कडून  ५ किमी अंतरावर वाशिमला जाणाऱ्या रोडपासून घाट प्रारंभी डाव्या बाजूला वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या चिंचखेड शिवारातील जंगलामध्ये झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी, सहा.उपनिरीक्षक मीरा सोनुने,हेकॉ.शिवकुमार वर्मा, अरविंद पवार,विकास जाधव,महिला कॉ.सोनाली राठोड यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचासमक्ष पंचनामा करून पातूर पोलिसांत मर्ग दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला.सदर घटनेतील महिलेची ओळख पटली नसून मृतक महिलेचे वय अंदाजे ५० र्षे आहे व अंगावर जांभळ्या रंगाची नऊवारी साडी,लाल रंगाचे ब्लाउज व डोक्याला पोपटी रंगाचा स्कार्फ गुंडाळलेला असून सदर महिलेस कोणी ओळखत असेल तर पातूर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पातूर पोलिसांनी केले आहे.