अकोला ताज्या बातम्या

गरसोळी येथे संगीतमय भागवत सप्ताहाची जोरदार सुरूवात

टीम, दैनिक राज्योन्नती
मुंबई : अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यामध्ये गरसोळी येथे श्री. विठ्ठल रूख्मीनी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळा निमित्य संगीतमय भागवत सप्ताहांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांची रंगतदार संगीतमय सुरूवात झाली असल्याने गरसोळी तसेच आजूबाजुच्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील गावकरी मंडळीनी तसेच संगीतमय भागवत सप्ताह ऐकण्यासाठी भाविकांनी मोठया प्रकारे गर्दी केल्याने गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गरसोळी गाव तसे दहिहंडा दर्यापुर रोड लगत असलेले ४ किलो मिटरवर वसलेले छोटेसे खेडे आहे. तसेच, अकोट रोड,कुटासा फाटयावरुन साधारपणे ५ किलोमिटर अंतरावर असलेले गरसोळी वारकरी वारसाने समृद्ध असलेले गाव.
गावाची लोकसंख्या कमी असलेली तरी मुख्य बाजारपेठ दहिहंडापासून जवळच आहे. गावाच्या आजुबाजूच्या परिसराला लागुन पातोंडा, रेल, धारेल, जऊखेड, हिंगणी, धोतर्डी, दहिहंडा, कुटासा, रोहणखेड, कावसा आदी ग्रामीण भाग जुळलेला आहे. गरसोळी हे महादेव कोळी समाजाची एकल लोकवस्ती असलेले गाव असल्याने अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यातील तसेच अकोला तालुक्यातील बारूला व आदी भागातून येणाऱ्या भाविकांचा उत्साह बघायला मिळत आहे. सात दिवसांच्या संगीतमय कार्यक्रमाचे कळस स्थापनेनंतर सांगता होणार आहे.
गरसोळी येथे हनुमान मंदिर पिढया पिढयापासून आहे मात्र, गावांमध्ये वारकरी वारसा वसला असल्याने विठ्ठल रुक्मीनी मंदीर नव्हते. त्यामुळे हनुमान संस्थानच्या वतीने श्री. विठ्ठल रूख्मीनी मंदिराचे निर्माण करून मंदिरात मुर्ती विराजमान करण्यासाठी गावातील हनुमान संस्थानच्या वतीने श्री. क्षेत्र पंढरपूर येथील श्री. विठ्ठल रूख्मीनी मुर्ती गावामध्ये जल्लोशात आणल्या गेल्या असून तसेच तुकाराम बीज या महिन्यात असल्याने गरसोळी गावातील हनुमान संस्थानच्या वतीने संगीतमय भागवत सप्ताह उत्साहात साजरा होत आहे.

आमच्या आजोबा पंजोबापासून गावामध्ये हनुमान मंदिर आहे. मात्र, गावामध्ये श्री. विठ्ठल रूख्मीनी मंदिर नव्हते. आषाढी एकादशी अथवा कार्तिक एकादशी निर्मित्त गावांमधून जल्लोशात ढोलाच्या भजनाची मिरवणूक काढून आषाढी एकदशीचा उत्साह साजरा करण्यात येतो. मात्र, यावेळी गावात मंदिर निर्माण झाल्याने साक्षांत श्री. विठ्ठल रूख्मीनीच्या दरबारात उत्साह साजरा करण्याचा आनंद गावकऱ्यांना मिळणार आहे. आज आमच्या गावात श्री. विठ्ठल रूख्मीनी प्राण प्रतिष्ठा आणि कळस स्थापनेसाठी संगीमय सप्ताहाच्या आयोजनामुळे गावातील वातावरण भक्तीमय झाले आहे, वर्षोनवर्षे असेच भक्तीमय वातावरण गावामध्ये निर्माण व्हावे, ही हनुमंतराया तसेच श्री. विठ्ठल रूख्मीनी चरणी प्रार्थना…

श्री, रमेशराव रामभाऊ
तरोळे – पाटील,

ग्रामस्थ, गरसोळी

गावाला लाभलेला वारकरी वारसा असल्याने श्री. विठ्ठल रूख्मीनी मंदिराची गावात कमी होती. मात्र आता ती पूर्ण झाली आहे. दरवेळी प्रत्येकाला पंढरपूर दर्शन जाता येईलच, असे नाही. त्यामुळे आता पंढरपूर दर्शनाला जाण्याचा योग जरी आला नसला तरी साक्षांत गावातच पांडूरंग आल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सर्व गावातील भावकीने व समाजाने पांडूरंगाच्या तसेच हनुमंतरायाच्या कृपेने गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले ते सदैव असेच राहो ही श्री. विठ्ठल रूख्मीनी तसेच हनुमंतराया चरणी प्रार्थना…

श्री. गजानन सुर्यभान
तरोळे -पाटील,

वाहतुक नियंत्रक,
विठ्ठलवाडी आगार जि. ठाणे.