अकोला

गरजू महिलांच्या मदतीसाठी विधीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नरत असावे – मोनिका राऊत

अकोला : गरजू महिलांच्या मदतीसाठी विधीच्या विद्यार्थ्यांनी मदत करून न्याय द्यावा, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले. दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्री नथमल गोयनंका विधी महाविद्यालय येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यशाळेत मोनिका राऊत बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी जी इ सोसायटीचे अध्यक्ष विधीज्ञ मोतीसिंग मोहता होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महिला विधीज्ञ मनीषा धूत आणि प्राध्यापिका शैलेजा अंधारे होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य जी व्ही एगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा सारडा यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ अनुपमा प्रल्हादराव चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा डॉ स्वप्निल सोनारे यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.