विदर्भ

गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधार महिलांना धान्य किराणा वाटप करून जागतिक आदिवासी दिन साजरा ,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांचा उपक्रम

 

अकोला १० ऑगस्ट / मुर्तिजापूर प्रतिनिधी
अजय प्रभे

मुर्तिजापूर – जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज शहरात ५२ गेट येथे कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रीय शहीद बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीच्या सभापती उर्मिला डाबेराव, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बबनराव डाबेराव , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश मडावी ,जेष्ट सल्लागार ज्ञानदेवराव डाखोरे, बाळू भोरकडे,रोहित सोळंके ,भारत भोरकडे ,राजेश डाखोरे, अरुण उईके,प्रल्हाद मडावी ,गजानन वाळवे ,यासर्व मान्यवरांच्या उपस्थितीत समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधार महिलांना किराणा धान्य किट वाटप करण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मडावी यांनी आपल्या प्रस्ताविकातून अदिवासी गौरव दिनाचा इतिहास सांगून आदिवासी समाजाने शिकून समाजाच्या विकासासाठी पुढे यावे असे आव्हान केले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी सभापती बबनराव डाबेराव यांनी आपल्या मनोगतातुन आदिवासी समाजाने जागृत राहून शिक्षणातून आपली प्रगती साधावी आदिवासी युवक -युवतींनी आपल्या अंगभूत क्षमतेनुसार शिक्षण, कृषी ,क्रीडा ,राजकीय अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून समाजाची व देशाची सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मडावी यांचे मार्गदर्शनात मुर्तिजापूर तालुक्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी केले
आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अडचणी अजूनही मार्गी लागलेले नाही त्या मुळे जगातील आदिवासी एक दिवसी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला जातो. विविध वेषभूषा, बोली भाषा, संस्कृती असलेला समाज हा ह्या दिवशी एकत्र येऊन जागतिक मुल निवासी दिवस साजरा करतात.
आदिवासी संस्कृती आधी पासून जल, जंगल, जमीन चे मालक आहेत, त्याचे रक्षण आदिवासी समाजाने केले आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका सचिव राजेश डाखोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ५२ गेटवरील अदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते