क्राईम

खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना काही तासातच अटक! अकोला जुने शहर पोलिसांची कारवाई

अकोला प्रतिनिधी:-२८डिसेंबर रोजी अकोला जुने शहर पोलिसांच्या डीबी पथकाने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुंडांना काही तासातच अटक केली. या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,२७डिसेंबर२०२१रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, शिवसेना वसाहती मधील दत्त चौकात राहणाऱ्या अशोक ठाकरे यांना राहुल मुदगल आणि रोहित शेंडे यांनी घरात घुसून ,क्षुल्लक कारणावरून चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते.अशा आशयाची तक्रार अशोक ठाकरे यांच्या पत्नी सौ.पुष्पा अशोक ठाकरे वय५९वर्षे, रा.दत्त चौक शिवसेना वसाहत अकोला यांनी, जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नमूद तक्रारीवरून राहुल तुळशीराम मुदगल वय२८वर्षे आणि रोहित उर्फ सारंग गजानन शेंडे वय २२ वर्षे रा.दोघेही भारती प्लॉट अकोला, यांच्या विरोधात वैद्यकीय अहवालावरून भादवी कलम ३०७,४५२,५०४,५०६,३४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांना नमूद आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिल्यावरून, डीबी पथकाने सापळा रचून नमूद आरोपींना रात्रीच्या अडीच वाजता मोठया शिताफीने अटक करून गुन्ह्यात वापरले शस्त्र जप्त केले. नमूद दोनही आरोपींना २८डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, दोनही आरोपींना न्यायालयाने २९डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश  सूर्यवंशी, पो. हे. कॉ. महेंद्र बहादूरकर, विजय बासबे,रतन दंदी, अर्जुन खंडारे,मयूर निखाडे यांनी केली.