अमरावती

खा. राणांच्या वडिलांना फरार घोषीत करण्याची कारवाई सुरूच राहणार

अमरावती : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे आहेत. नवनीत राणा यांच्या वडीलांना फरारी म्हणून घोषित करण्याच्या कारवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

शिवडी महानगर दंडअधीकारी कोर्टाने आपले आदेश कायम राखले आहेत.बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंह हे देखील सहआरोपी आहेत. नवनीत राणा अधिवेशनात असल्याने कोर्टासमोर हजर राहू शकल्या नाहीत पण त्यांचे वडील कुठेही व्यस्त नसताना का कोर्टासमोर हजर राहिले नाहीत, यासाठी त्यांच्याविरोधात समन्स बजावण्यात आलं.

त्यानंतर देखील ते कोर्टासमोर हजर झाले नाही. तेव्हा त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. तरीही ते कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यानंतर देखील ते कोर्टात हजर झाले नाही. यानंतर त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाला.

या आदेशाला राणा यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची ही याचीका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शिवडी दंडाधिकारी कोर्टाने फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.