अमरावती

खासदार नवनवीन राणा आणि  निरीक्षक यांच्यात खडाजंगी!वीस वर्षीय हिंदू तरुणीचे बळजबरीने लग्न लावल्याच्या आरोप

अमरावती७सप्टेंबर:-अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनित राणा,ह्या नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतात. सात सप्टेंबर रोजी अमरावती शहरातील राजपेठपोलीस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे आणि पोलीसउपायुक्त विक्रम माळी यांच्यात खडाजंगी झालीची माहिती आहे.नवनीत राणा आणि पोलिसां मध्ये झालेल्या बाचाबाचीला एका वीस वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून लव्ह जिहाद संघटने मार्फत तिचा बळजबरीने विवाह लावून दिल्याचे आरोप केला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अशी आहे की,अमरावती येथील एका वीस वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिचा बळजबरीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. तसेच तरुणीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करा, अशी मागणी करीत नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह येथील राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच बाचाबाची झाली.हिंदू तरुणीला डांबून ठेवण्यात आले असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो काहीही माहिती देण्यास तयार नाही. पोलीसही तत्परतेने कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. आपण जेव्हा राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना या संदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी आपले संभाषण ध्वनिमुद्रित केले हा हक्क त्यांना कोणी दिला असा सवाल नवनीत राणा यांनी केला. यावेळी त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी चांगलीच बाचाबाची झाली. राजापेठ पोलीस ठाण्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.