अकोला

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून साडेसहा लाखाचा गुटका जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अकोला प्रतिनिधी:-२७ऑक्टोबर अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मोठया प्रमाणात गुटका जप्त केल्याने,अकोला जिल्हा पोलिसांनी सुद्धा अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी कंबर कसली असून, २७ऑक्टोबर रोजी,अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड परिसरात येत असलेल्या पावसाळे ले-आऊट मधील प्रतिबंदीत गुटख्याच्या गोदामावर धाड टाकून साडेसहा लाख रुपयांचा गुटका जप्त करण्यात, अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की, अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय गोपाळ मावळे यांना,त्यांच्या खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की,खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पावसाळे ले-आऊट मधील ज्ञानेश्वर पोहरे यांच्या गोडाऊन मध्ये,विमल, नजर, सम्राट,पानबहार मसाला असे लेबल असलेल्या प्रतिबंदीत गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा आहे, त्या माहिती च्या आधारे अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने,नमूद ठिकाणी जाऊन  गोडावून ची तपासणी केली असता,मोठ्या प्रमाणात प्रतिबंदित गुटक्याचा साठा मिळून आला.पोलिसांनी संबंधित गोडाऊन मालकाकडे नमूद गुटख्याचा साठा कोणाच्या मालकीचा आहे,याची विचारणा केली असता, संबंधित गुटक्याचा साठा ज्ञानेश्वर उर्फ बाबू मारोती पोहरे आणि रामा शेवाळे यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने,त्यांच्या विरोधात खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,या कारवाई मध्ये एकूण ६लाख४५हजार रुपयांचा गुटक्याचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण, एएसआय गोपाळ मावळे,फिरोज खान,संदीप काटकर, शक्ती कांबळे,उदय शुक्ला,वीरेंद्र लाड,पवन यादव,महिला पोलीस शिपाई गीता अवचार यांनी केली.