अकोला

कोविड: अकोला जिल्ह्यात एक पॉझिटीव्ह

अकोला: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३६ अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्हआरटीपीसीआर(शा.वै.म. १ व खाजगी ०)१+रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी ०ृएकूण पॉझिटीव्ह १.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून हा रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६१०२ (४९९६९ + १५१४२ + ९९१) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.